मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

गुजरात, महाराष्ट्राच्या मच्छीमारांना मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन


मुंबई : इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनमधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने बुधवारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर १५ ऑगस्टपर्यंत करण्याची मागणी केली.


गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत करण्याचा जोर सर्व पारंपरिक मच्छीमारांकडून धरू लागली आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत वादळी वारे मोठ्या प्रमाणात होत असतात. ज्यामुळे समुद्र खवळलेला असतो. ज्यामुळे मच्छीमारांची जीवित हानी तसेच नौकांचे नुकसान टाळण्याकरिता पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करण्याची रास्त मागणी उपस्थित मच्छीमारांकडून यावेळी करण्यात आली.


मंत्री नितेश राणेंनी सदर मागणी योग्य असल्याचे उपस्थित मच्छीमारांना सांगून गुजरात राज्याच्या धर्तीवर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन मच्छीमार शिष्टमंडळाला दिले.


तसेच पुढील आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना भेटून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील वर्षापासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्टपर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपस्थित कोळी बांधवांना आश्वासन देण्यात आले.


यावेळी महाराष्ट्रातून फेडरेशनचे प्रतिनिधी देवेंद्र दामोदर तांडेल (मुंबई), संजय कोळी, विनोद पाटील, नयना पाटील आणि गुजरात राज्यातून वेलजीभाई मसानी, भगुभाई सोलंकी, राकेशभाई कुवारा, कन्हैयालाल सोलंकी, सुनीलभाई गोहेल, रामभाई सोलंकी, नरसी भाई बारया, रमेशभाई बदरशाही साहिल आदी मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन