बॉम्ब धमकीनंतर दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये हाय अलर्ट! सुरक्षा व्यवस्था कडक

मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्समध्ये येत्या 27 नोव्हेंबर 2026 रोजी, दिलजित दोसांझचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या म्युझिक कॉन्सर्टमधील सेक्युरिटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना धमकीचे ई-मेल येताना दिसत आहे. हे सर्व प्रकरण सध्याच्या घडीला ताजं असताना आता अशातच प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आणि अभिनेता दिलजित दोसांझच्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्समध्ये येत्या 27 नोव्हेंबर 2026 रोजी, दिलजित दोसांझचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या म्युझिक कॉन्सर्टमधील सेक्युरिटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.



दरम्यान, दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमालाही धमकीने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्याच्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Mid- Day ने दिलेल्या वृत्तानुसार, दोसांझने मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्समध्ये कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. मात्र, कॉन्सर्टच्या दिवशी कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.



महालक्ष्मी रेसकॉर्सवर येण्यासाठी सहसा तीन गेटवर प्रेक्षकांची तपासणी केली जाते, पण या कार्यक्रमावेळी सुरक्षा रक्षकांकडून पाच गेटवर तपासणी केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी महालक्ष्मी रेसकॉर्सच्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याची माहिती एका विश्वसनीय सुत्राने दिलेली आहे. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दिल्लीतील कॉन्सर्टबद्दल पुढे बोलताना, सूत्राने सांगितले की, पूर्वी 400 खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार होते. परंतू, आता दिलजीतच्या कार्यक्रमामध्ये मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी ही संख्या 1500 ते 2000 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.



पुढे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “कार्यक्रम स्थळाच्या 500 ते 700 मीटरपर्यंत ‘नो-कार झोन’ आणि वाहतुकीवर निर्बंध लादण्यात येणार आहेत. महालक्ष्मी रेसकॉर्सच्या बाहेर दिलजीतच्या कार्यक्रमाच्या दिवशी मुंबईमध्ये साध्या वेशामध्ये पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय, ज्या हॉटेलमध्ये दिलजीत राहणार आहे, त्या हॉटेलच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात येणार आहे. अतिरिक्त सुरक्षा त्या हॉटेलवर ठेवली जाणार आहे. आयोजकांकडून गायकाविषयीची कोणतीही माहिती पत्रकारांना किंवा युट्युबर्सला न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” कॉन्सर्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाणार आहे. इतकंच नाही तर, त्यांच्या मोबाईलची सुद्धा तपासणी केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

Comments
Add Comment

खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘दै. प्रहार’ दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन

मुंबई : कथा, कविता, लेख आणि प्रवासवर्णनांच्या माध्यमातून विविध विषयांचा वेध घेणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या दिवाळी

Mumbai Fire work Ban: मुंबईत रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या

खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘प्रहार न्यूजलाईन’च्या सिल्व्हर बटनचे अनावरण! डिजिटल टीमचे कौतुक

मुंबई : डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘प्रहार न्यूजलाईन’ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, युट्यूबकडून

मुंबई- पुणे प्रवास सुसाट! जुना Mumbai-Pune Highway होणार सहापदरी, काय आहे MSRDC चा प्लॅन?

मुंबई: मुंबई- पुणे या दोन शहराला जोडणाऱ्या मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई- पुणे महामार्ग असे दोन पर्याय

मुंबईत पहिल्या रोपवेचा मार्ग मोकळा; मुलुंडच्या रोपवेसाठी सल्लागार नियुक्तीची साबां विभागाने काढली निविदा

मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंडच्या

बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन