IEX शेअर २८% कोसळल्याने बाजारात घबराट लाखो गुंतवणूकदारांचे मिळून १४५० कोटी 'पाण्यात'

मुंबई:आईएक्स (इंडियन एनर्जी एक्सचेंज IEX) शेअर आज २८% कोसळल्याने गुंतवणूकदारांचे थोडे थोडके नाही तर १३.६ लाख किरकोळ गुंतवणूकदारांना १४५० कोटींचे नुकसान झाले आहे. कंपनीचा शेअर आज बाजारात २८% घसरल्याने बाजारात हाहाका र झाला.अखेरच्या सत्रात बंद होताना कंपनीच्या शेअर्समध्ये २७.८९% घसरण झाल्याने कंपनीची शेअर १३५.४९ रूपयांवर बंद झाला आहे. ही महाकाय घसरण केवळ एका निर्णयामुळे झाली ज्यात देशाच्या केंद्रीय विद्युत नियामक आयोग (Central Electricit y Regulatory Commission CERC) या नियामक मंडळाने सगळ्या एनर्जी एक्सचेंजवर Market) भारतातील सर्व पॉवर एक्सचेंजेसमध्ये टप्प्याटप्प्याने मार्केट कपलिंग सुरू करण्यास मान्यता दिल्याने गुरुवारी अखेर सत्रात इंडियन एनर्जी एक्सचेंजेस (IEX) च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

मार्केट कपलिंगम्हणजे एक पद्धत जी ऊर्जा बाजारपेठेत वेगवेगळ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा एक्सचेंजेसमध्ये वीजेसाठी एकच, एकसमान किंमत तयार करण्यासाठी एक सुनियोजित मॉडेल वापरले जाते ज्याचा फटका बाजारात मोठ्या प्रमाणात बसला होता. आज जून २०२५ च्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. आणि आजच कंपनी आपला तिमाही निकाल जाहीर करणार असल्याने बाजारातील या शेअर्समध्ये अस्थिरतेचे वातावरण व घबराट पसरल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात या शेअरची दबावापोटी वि क्री केली असल्याची शक्यता आहे.

बुधवारी याविषयी कमिशनने लेखी सूचनांच्या आधारे निर्णय लागू करण्याचे ठरविले. आपल्या निर्णयात कमिशनने अधिकृतपणे म्हटले आहे की,'CERC च्या मते, ग्रिड-इंडियाने केलेल्या सबमिशन आणि झालेल्या विविध सल्लामसलतींच्या आधारे.आयोगाने टप्प्या टप्प्याने मार्केट कपलिंग लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.' असे म्हटले. पॉवर मार्केट कपलिंग ही वीज बाजारपेठांमध्ये अनेक पॉवर एक्सचेंजेसकडून बोली एकत्रित करून आणि त्यांना केंद्रीयरित्या मंजूर करून केली जाणारी एक यंत्रणा आहे.
Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली