बंद कारखान्यांमधून अमली पदार्थ जप्त

महाड  :  महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलिस व अमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹८८.९२ कोटी किमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला. बंद असलेल्या या कारखान्यात बेकायदेशीररीत्या रसायन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेले कारखाने आता पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.


एमआयडीसीतील बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.


या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले. सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने बंद असून छुप्या पद्धतीने अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

गड वाचवणं म्हणजे इतिहास वाचवणं; तरुणांनी शिवरायांकडून शिकावं - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संविधान दिनाच्या निमित्ताने ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हे अभियान रायगडावर आज पार पडलं आणि उपमुख्यमंत्री

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Raigad Road Accident: श्रीवर्धनहून परतताना काळाचा घाला! म्हसळा बायपासवर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. श्रीवर्धन-माणगाव मार्गावरील म्हसळा

Alibaug Traffic Tragedy: सायरन वाजत होता, आई-वडील रडत होते; पण वाहतूक कोंडीने हिरावला २० महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव!

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नियोजनामुळे एखाद्याचा किती मोठा नुकसान होऊ शकते, याची जाणीव करून देणारी

Raigad Fire : उरणमध्ये तेल निर्मिती प्रकल्पाला भीषण आग; आकाशात धुराचे लोट, सिडको अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Uran : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरणजवळील वेश्वी गावात सोमवारी एका औद्योगिक गोदामाला भीषण आग लागल्याची

Uran Water Shortage: उरणकरांनो पाणी जपून वापरा! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांवर पाणी कपातीचे संकट

उरण: उरण शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे उरण शहरातील