दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी


देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या प्रयत्नांमुळे जेरबंद झाला आहे. तुकाराम दाजीबा वाघ यांच्या शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता हा बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी विजय पगार, जी. जी. पवार, ठाकरे आणि भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत बिबट्याला ताब्यात घेतले.

जेरबंद बिबट्यानंतरही परिसरात बिबट्याचा वावर


एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही दहिवड येथील लवखाड मळ्यात बिबट्याचा वावर कायम असल्याचे समोर आले आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास त्याच परिसरात एका बिबट्याने डाळिंब बागेत डरकाळी फोडून एका शेतकऱ्यावर चाल केली. भयभीत झालेल्या शेतकऱ्याने तातडीने घराच्या दिशेने पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मते, या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे वास्तव्यास असून, यामुळे दहशतीचे वातावरण कायम आहे. भविष्यात कोणताही अनर्थ घडण्याआधी वन विभागाने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन


दरम्यान, मौजे दहिवड, लवखाड मळा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी वन विभागाने एक विशेष आवाहन केले आहे.
आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि दक्षता घेऊन शेतीची कामे करावीत, असे वन विभागाने म्हटले आहे. परिसरात काही संशयास्पद हालचाल किंवा बिबट्याचे अस्तित्व आढळल्यास सुरक्षित मार्गक्रमण करावे. तसेच, कोणत्याही वन्यजीवाला डिवचण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने

Nashik Kumbh Mela : कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन

Nashik Kumbh Mela : : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य

Nashik Crime : '...तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल' कुटुंबियांना धमकी ; 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव अन्... नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर

Nashik News : पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी अन्... आर्थिक फसवणुकीतील फरार संशयिताला नाशिकरोडमध्ये अटक

Nashik News : आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या आणि एमपीआयडी कायद्यांतर्गत

Nashik : उत्तर महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय ! स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी, मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवांचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यात आखाड्यांचं महत्त्व काय? त्यांचं काम आणि त्या मागचं रहस्य काय? जाणून घ्या

आखाडा हा शब्द वाचला की पहिलं डोक्यात येते ती कुस्ती... कुस्तीसाठीच आखाडा हा शब्द प्रचलित आहे. मग कुंभमेळ्यात भाग