Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतरखाना बंद करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने ताडपत्री टाकून कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. ज्यामुळे आंदोलककर्ते भडकले आणि त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत कबुतर खान्याची ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला. यात महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट देखील झाली. हा राडा व्हिडिओ आणि फोटोच्या मध्यमातून सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


आज सकाळपासून दादर येथील कबुतरखाना वाचवण्यासाठी जैन समाजाने केलेल्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  ते म्हणले, "जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल." देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.



"एकीकडे धार्मिक आस्था आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे": देवेंद्र फडणवीस 


आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपली प्रतिकिया दिली. दादरच्या कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे धार्मिक आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यावर काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहेत. ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे, तीदेखील खंडित होणार नाही आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण होणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


दरम्यान, दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेने जी ताडपत्री टाकली होती. ती जैन समूदायाच्या आंदोलकांनी काढली, त्याचे बांबूही तोडण्यात आले. त्यानंतर हा कबुतरखाना न्यायालयाच्या विरोधात जाऊन पुन्हा सुरू करण्यात आला आहे.


 
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म