गणेशोत्सवात चार दिवस ध्वनीक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी २८ ऑगस्ट, पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी १ सप्टेंबर, गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचवा दिवस हा १ सप्टेंबर नसून तो ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्याची बाब गणेशोत्सव समितीने लक्षात आणून दिली आहे.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यामध्ये तारखांचा गोंधळ असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी समन्वय समितीने शहर व उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.


ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनीप्रदुषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म