राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी


मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. अर्ज भरण्यास सप्टेंबरमध्ये सुरुवात होऊन ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होतील.


राज्याच्या गृह विभागाने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदे भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक अर्ज येतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता भरतीचा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ‘प्रशिक्षण व खास पथके’चे अपर पोलीस महासंचालक एक सेवा पुरवठादार कंपनी निवड करणार आहेत. त्या माध्यमातून अर्ज स्वीकृती व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी गृह विभागाला देईल. त्यानंतर मैदानी चाचणी सुरू होईल. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.


पोलीस भरतीसाठीच्या जागा




  • पदनाम रिक्त पदे

  • पोलीस शिपाई १२,३९९

  • पोलीस शिपाई चालक २३४

  • बॅण्डस्मन २५

  • सशस्त्र पोलीस शिपाई २,३९३

  • कारागृह शिपाई ५८०

  • एकूण पदे १५,६३१


वयोमर्यादा संपलेल्यांना एक विशेष संधी


२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना आगामी पोलीस भरतीसाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे. ते उमेदवार देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरम्यान, उमेदवारांना यंदा पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गतवर्षी हे शुल्क एक हजार रुपये होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने