आशिया कप २०२५ पूर्वी बीसीसीआयमध्ये मोठे बदल, राजीव शुक्ला बनले हंगामी अध्यक्ष

मुंबई : एशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे,त्याला सुरू होण्यास आता दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ उरला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव शुक्ला यांना बीसीसीआयचा कार्यवाहक अध्यक्ष नेमण्यात आलं आहे. रॉजर बिन्नी लवकरच अधिकृतपणे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.


२७ ऑगस्ट रोजी राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत भारतीय संघाच्या टायटल स्पॉन्सरशी असलेल्या ड्रीम11 च्या कराराच्या समाप्तीवर आणि नवीन करार शोधण्यावर चर्चा झाली. सांगायचं झालं तर, २०२२ मध्ये सौरव गांगुली अध्यक्ष पदावरून हटल्यानंतर रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. आता ते ७० वर्षांहून अधिक वयाचे झाले असल्याने ते लवकरच आपला राजीनामा जाहीर करू शकतात.


राजीव शुक्ला यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५९ रोजी झाला होता. सध्या त्यांचे वय ६६ वर्षे आहे. ते आधी पत्रकार होते, त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक खास स्थान निर्माण केलं. २०१५ मध्ये त्यांची आयपीएलचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. १८ डिसेंबर २०२० रोजी त्यांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनवण्यात आलं. सध्या ते छत्तीसगडमधील राज्यसभा खासदारांपैकी एक आहेत.


नियमांनुसार, कोणत्याही बीसीसीआय पदाधिकाऱ्याचे कमाल वय ७० वर्षे आहे. रॉजर बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी झाला असून, ते आता ७० वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे ते अध्यक्षपदावर राहण्यास अयोग्य ठरतात. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत राजीव शुक्ला हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहतील. बीसीसीआय सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोढा समितीच्या शिफारसींवर आधारित संविधानानुसार चालते.


रॉजर बिन्नी हे १९८३ च्या वर्ल्ड कप विजेता संघाचे सदस्य होते. त्यांनी भारतासाठी २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामने खेळले असून, अनुक्रमे ४७ आणि ७७ विकेट्स घेतल्या आहेत.बीसीसीआय सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन टायटल स्पॉन्सर शोधत आहे. कारण ऑनलाइन गेमिंगसंबंधी नवीन कायदा आल्यामुळे ड्रीम11 सोबतचा करार नियोजित कालावधीपूर्वीच संपुष्टात आला आहे. एशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, आणि त्याआधी नवीन टायटल स्पॉन्सर मिळवणं आव्हानात्मक वाटतंय. बीसीसीआय काही दिवसांत नवीन प्रायोजकासाठी जाहिरात जारी करू शकतो.


Comments
Add Comment

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हार्दिक पांड्या बाहेर; पुनरागमन लांबणीवर!

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार

IPL 2027 Trade News: हार्दिक पांड्याची मुंबईला सोडचिठ्ठी! पंजाब किंग्समध्ये नवी एंट्री, अर्शदीप MI मध्ये

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या

मैदानावर हे सोपे नव्हते...! दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयानंतर कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय

IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत

Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीचा संताप, फॅन्सच्या त्या कृतीमुळे झाला नाराज

क्रिकेट मैदानात सामना सुरू असताना फॅन्स लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर, विचित्र हावभाव वगैरे करत असतात. क्रिकेट

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय