भारताचा डाव
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. कर्णधार शुभमन गिलला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूचा सामना करताना विकेट दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. विराट कोहली 7 धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माने या सामन्यात सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 23 धावांची खेळी केली. अक्षर पटेलही फार काळ तग धरू शकला नाही. त्याचा खेळही 7 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची जोडी जमली. या जोडीने 43 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर 30 धावा करून बाद झाला आणि पुन्हा दडपण वाढलं. नमन धीर 12, तर अंशुल कंबोज 1 धाव करून तंबूत परतला. सुदैवाने भारतीय संघ 4 धावांनी पुढे होता. अन्यथा हा सामना हातून गेला असता.
क्रिकेट मैदानात सामना सुरू असताना फॅन्स लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर, विचित्र हावभाव वगैरे करत असतात. क्रिकेट सामन्यात या गोष्टी होत असतात. पण भारत ...
न्यूझीलंडचा डाव
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. कारण न्यूझीलंडला सुरूवातीला धक्के बसले. अवघ्या 53 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत होता. विल यंग 6, टिम सैफर्ट 0, हेनरी निकोल्स 11, टॉम लॅथम 7, ग्लेन फिलिप्स 0 असे बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती नाजूक झाली. पण सहाव्या विकेटसाठी डॅरेल मिचेल आणि मिचेल सँटनर यांनी 90 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव काही अंशी सावरला. यात डॅरेल मिचेलल एक जीवदान मिळालं. त्याने 104 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर मिचेल सँटनर 31 धावा करून बाद झाला. यानंतर नाथन स्मिथ 3, कायल जेमिसन 7 आणि ब्लेयर टिकनर 2 धावा करून तंबूत गेले. भारताकडून गुरनूर ब्रारने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. तर आकिब नबी 2, अंशुल कंबोज 2 आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.