Lionel Messi: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत... ४ सप्टेंबर रोजी खेळणार शेवटचा घरगुती सामना!

बुएनोस आइरेस: फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीने निवृत्तीचे संकेत देत, जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का दिला आहे. ३८ वर्षीय अर्जेंटिनाच्या या स्टारने स्पष्ट केले आहे की त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.  मेस्सीने संकेत दिले आहे की ४ सप्टेंबर रोजी ब्यूनस आयर्समधील एस्टाडिओ मोन्युमेंटल स्टेडियमवर व्हेनेझुएला विरुद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा त्याचा शेवटचा घरगुती सामना असू शकतो.

ॲप्पल टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मेस्सीने निवृत्तीचे संकेत दिले. त्यात तो म्हणाला, "हा सामना माझ्यासाठी शेवटचा क्वालिफायर सामना असू शकतो. यानंतर कोणतेही मैत्रीपूर्ण किंवा इतर सामने होतील की नाही हे मला माहित नाही... पण या सामन्यासाठी माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत असेल. माझी पत्नी, माझी मुले, माझे पालक, माझे भावंड आणि माझ्या पत्नीचे सर्व नातेवाईक या स्टेडियममध्ये उपस्थित असतील." मेस्सीच्या या विधानामुळे जगभरातील त्याच्या लाखों चाहत्यांना मेस्सी निवृत्ती घेणार आहे की काय? असा प्रश्न पडला आहे.

विश्वचषकासाठी अर्जेंटिना आधीच पात्र


अर्जेंटिना आधीच २०२६ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. हा संघ ३५ गुणांसह दक्षिण अमेरिकन पात्रता टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, हा सामना अर्जेंटिनासाठी फक्त एक औपचारिकता आहे, परंतु मेस्सी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा एक अतिशय भावनिक क्षण ठरणार आहे.

मेस्सीचा क्वालिफायर रेकॉर्ड


आतापर्यंत मेस्सीने १९३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी त्याने विश्वचषक पात्रता फेरीत ३१ गोल ​​केले आहेत. २०२२ चा कतार विश्वचषक जिंकून त्याने अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर विश्वविजेते बनवले. ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. मेस्सी ९ सप्टेंबर रोजी इक्वेडोरविरुद्ध क्वालिफायर सामना खेळू शकतो, पण तो सामना बाहेर असेल. त्यामुळे, ४ सप्टेंबर हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा ब्युनोस आयर्सच्या प्रेक्षकांना त्यांच्या हिरोला क्वालिफायरमध्ये घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल.

जर ४ सप्टेंबर रोजी होणारा सामना मेस्सीचा शेवटचा घरगुती पात्रता सामना ठरला, तर तो अर्जेंटिनाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक असेल. मेस्सीने अद्याप अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केलेली नसली तरी, त्याच्या संकेतावरून स्पष्ट झाले आहे की फुटबॉलचा हा सुवर्ण अध्याय आता संपण्याच्या जवळ आहे.
Comments
Add Comment

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हार्दिक पांड्या बाहेर; पुनरागमन लांबणीवर!

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार

IPL 2027 Trade News: हार्दिक पांड्याची मुंबईला सोडचिठ्ठी! पंजाब किंग्समध्ये नवी एंट्री, अर्शदीप MI मध्ये

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या

मैदानावर हे सोपे नव्हते...! दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयानंतर कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय

IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत

Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीचा संताप, फॅन्सच्या त्या कृतीमुळे झाला नाराज

क्रिकेट मैदानात सामना सुरू असताना फॅन्स लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर, विचित्र हावभाव वगैरे करत असतात. क्रिकेट

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय