रत्नागिरीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

रत्नागिरी : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी देवरूखच्या पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साध्या वेशात गस्त घालणाऱ्या देवरूखच्या दोन पोलीस हेडकॉन्स्टेबलना तरुणांचा संशय आल्याने सखोल चौकशी केल्यावर शिकारीचा उद्देश उघड झाला. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

रात्री गस्त घालताना विघ्रवली एस टी बस स्टॉप (देवरूख) ते सोनवडे रस्त्यावर दोघे जण डोक्याला बॅटरी लावलेले दिसले. गस्त घालणाऱ्या अभिषेक वेलणकर आणि सचिन कामेरकर या दोन हेडकॉन्स्टेबलनी त्या दोन स्कूटरस्वारांकडे विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांचाच संशय बळावला आणि अधिक चौकशी केली यापैकी एकाकडे जिवंत काडतूस आणि बंदूक आढळली.

प्रीतेश प्रतिपाल आडाव (वय २६ वर्षे, रा. कांजिवरा, देवरूख आणि साहिल संतोष कदम (वय १९, रा. ओझरे बौद्धवाडी) अशी अटक केलेल्या दोन तरुणांची नाव असून हे तरुण वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत दुचाकीसह गावठी बंदूक, जिवंत काडतूस बॅटरी जप्त करण्यात आली.

विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.