गणेश विसर्जनानिमित्ताने उद्यापासून रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी:  गणेश विसर्जना निमित्ताने दिनांक २, ४, ६ आणि ७ सप्टेंबरला रत्नागिरी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी गौरीगणपती, ४   सप्टेंबर रोजी ९ दिवसांचे गणपती, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आणि ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. यावेळी मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या प्रत्येक गणेशमूर्तीसह वाहने येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मांडवी समुद्र किनारी सार्वजनिक व खासगी गणपती मूर्ती वाहनातून विसर्जन करण्यासाठी रामनाका - राधाकृष्ण नाका - गोखलेनाका विठ्ठल मंदिर - काँग्रेस भवन या मार्गाने मांडवी समुद्र किनारी जातात. या मुदतीत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ परिसरात भाविकांची व खरेदीदार यांची वर्दळ असल्याने जे भाविक गणपती विसर्जनाकरिता वाहने घेऊन येणार आहेत, त्यांच्याच वाहनांना आत प्रवेश देऊन अन्य वाहनांना प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याकरिता गणपती विसर्जनादिवशी दुपारी ते रात्री १२ या वेळेत गणेशमूर्ती विसर्जनाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरीक्त अन्य वाहनांना रामनाका राधाकृष्ण नाका- गोखलेनाका विठ्ठल मंदिर काँग्रेस भवन मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजारचौक- भुतेनाका मत्स्यालय -मांडवी समुद्र किनारा या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण