राज्यात अतिवृष्टीमुळे १४.४४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर)  शेती पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. १५ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे हे नुकसान झाले आहे.


या नुकसानीमध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय, भाजीपाला, फळे, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड, वाशीम, यवतमाळ, धाराशिव आणि बुलढाणा यांचा समावेश आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात ६.२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.



सर्वाधिक बाधित जिल्हे


नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर,
वाशीम – १,६४,५५७ हेक्टर,
यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर,
धाराशिव - १,५०,७५३ हेक्टर,
बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,
अकोला – ४३,८२८ हेक्टर,
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर,
हिंगोली – ४०,००० हेक्टर


बाधित पिके - सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.


एकूण बाधित जिल्हे : नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने