दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी विभागाने 21 नोव्हेंबरपर्यंत दररोज 26 जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध मार्गांवर विशेष बससेवा उपलब्ध होणार आहे. आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे.

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागाने विशेष नियोजन केले आहे. येत्या 21 नोव्हेंबरपर्यंत लांब आणि मध्यम पल्ल्याच्या विविध मार्गांवर दररोज 26 जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या तसेच तेथून कोकणात येणाऱ्या प्रवाशांना या अतिरिक्त सेवांचा लाभ मिळणार आहे.



जादा बसफेऱ्यांचे आरक्षण सुरू


दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी नियमित बसफेऱ्यांसोबत या 26 जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व जादा फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांना बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, अधिकृत खासगी एजंट किंवा एसटीच्या मोबाइल ॲपद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार आहे.



जादा फेऱ्यांचे मार्ग आणि वेळापत्रक












































































































































मार्ग जाण्याची वेळ परतीची वेळ
दापोली – छत्रपती संभाजीनगर पहाटे 5:30 सकाळी 6:30
दापोली – परळी पहाटे 5:00 सकाळी 6:30
खेड – चिंचवड दुपारी 1:30 रात्री 10:30
खेड – विरार रात्री 8:30 रात्री 8:30
खेड – बोरिवली दुपारी 3:00 दुपारी 3:00
खेड – बोरिवली रात्री 10:15 रात्री 10:15
खेड – नांदेड पहाटे 5:30 सकाळी 10:00
खेड – बीड संध्याकाळी 6:00 दुपारी 12:30
चिपळूण – पुणे (ताम्हाणी मार्गे) पहाटे 5:30 दुपारी 1:00
चिपळूण – स्वारगेट दुपारी 12:00 रात्री 10:00
चिपळूण – ठाणे सकाळी 9:30 रात्री 9:30
चिपळूण – मुंबई सकाळी 11:30 रात्री 10:30
चिपळूण – बोरिवली सकाळी 9:00 रात्री 8:45
चिपळूण – बोरिवली सकाळी 10:30 रात्री 9:30
देवरूख – स्वारगेट (चिपळूण मार्गे) सकाळी 9:30 रात्री 9:15
देवरूख – नाशिक (पुणे मार्गे) सकाळी 11:00 सकाळी 8:30
रत्नागिरी – पंढरपूर सकाळी 6:45 रात्री 7:30
रत्नागिरी – पंढरपूर संध्याकाळी 7:30 सकाळी 6:45
रत्नागिरी – पुणे (कोल्हापूर मार्गे) पहाटे 5:15 रात्री 7:00
रत्नागिरी – पुणे संध्याकाळी 7:00 पहाटे 5:15
लांजा – कोल्हापूर (रत्नागिरी मार्गे) सकाळी 10:45 संध्याकाळी 4:30
लांजा – धाराशिव संध्याकाळी 5:00 संध्याकाळी 4:00
लांजा – बोरिवली सकाळी 6:30 पहाटे 5:00
राजापूर – रत्नागिरी – कोल्हापूर सकाळी 7:45 दुपारी 3:30
मंडणगड – छत्रपती संभाजीनगर (पुणे मार्गे) सकाळी 7:45 सकाळी 8:45
मंडणगड – बोरिवली दुपारी 12:00 रात्री 8:30

महिला प्रवाशांना कार्डशिवाय सवलत


एसटी महामंडळाने 1 ऑक्टोबर 2026 पासून महिला प्रवाशांना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अनिवार्य केले होते. मात्र, सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डशिवायही तिकीट सवलतीचा लाभ घेता येणार आहे.



आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन


दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी विभागून सुरक्षित आणि वेळेवर प्रवास व्हावा, यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करावे आणि एसटी महामंडळाच्या जादा फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने

Nagpur Metro: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, दिवाळी सणानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळेत बदल

नागपूर: दिवाळी सणानिमित्त नागपूर शहरातील मेट्रो सेवा काही ठराविक वेळेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय 'नागपूर

मोठी बातमी ! दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड