भाजप नेत्या नवनीत राणा फेस्टिव्ह मूडमध्ये! गणेश मंडळ आरतीमध्ये वाजवला ढोल

अमरावती: सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) प्रचंड धामधूम महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे.  अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकं देखील गणेशोत्सवाच्या आरती आणि मिरवणुकीत बेभान होताना पाहायला मिळतात. असेच काहीसे दृश्य अमरावती येथे पाहायला मिळाले. अमरावती येथील गणेशोत्सवानिमित्त अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एक वेगळाच अंदाज यानिमित्ताने सर्वांसमोर आला. अष्टविनायक गणेश मंडपात दर्शन करताना त्यांनी तेथील आरतीचा आनंद घेताना, ढोलवादनाचा आनंद लुटला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांचा फेस्टिव्ह मूड सध्या ऑन आहे. इतरांप्रमाणे त्या देखील गणेशोत्सवाचा आनंद घेताना दिसून येत आहे. दरम्यान, अमरावतीच्या नवसारीतील जवाहर नगर येथील अष्टविनायक गणेश मंडपात त्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मंडळात पूजा आणि आरती सुरू होती. ढोल-ताशांचा गजर आणि गणपतीची आरती या भक्तीमय वातावरणामुळे मंडळामधील वातावरण उत्साही झाले होते. त्यामुळे, नवनीत राणा स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या थेट ढोल पथकात सामील झाल्या.



नवनीत राणा यांनी ढोलाच्या तालाशी लय जुळवत संपूर्ण उत्साहाने ढोल वाजवला. त्यांची ही वेगळी बाजू पाहून मंडळामध्ये उपस्थित असलेले सर्वजण  उत्साहित झाले. कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवून त्यांच्यासोबत गणेश आरतिचा आनंद घेतला.

नवनीत राणा यांचा ढोल वाजवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये सामान्य लोक, नेते आणि कलाकार देखील पूर्ण भक्तीने सहभागी होतात. अशा प्रसंगी नेत्यांचे जनतेमध्ये येणे-जाणे सामान्य आहे, परंतु नवनीत राणा यांच्या ढोल वाजवण्याच्या अनोख्या शैलीवर अमरावतीकर प्रचंड खुश झालेले दिसून येत आहे.

सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. अनेक युजर्सनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हंटले की, नेत्यांनी अशा प्रकारे थेट जनतेशी जोडले पाहिजे. थोडक्यात काय नवनीत राणा यांच्या ढोल वादनाने अमरावतीकरांचे मन जिंकले.
Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात