जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.


जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भिती आहे. नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही पण सरकार अदानी सारख्या भांडलदारांसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात कोणीही आंदोलन करु नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून १० सप्टेंबर व त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने