आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत उपोषण छेडलं होतं. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सरकारवर दबाव निर्माण झाला. त्यानंतर मराठा आरक्षणाशी संबंधित आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय जारी केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर थेट न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे.


आता मराठा समाजाच्या पावलावर पाऊल ठेवत ओबीसी समाजही रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. दसऱ्यानंतर ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.


दरम्यान, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेविरोधात दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यामध्ये अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत ती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सुनावणी प्रलंबित असतानाच या अधिसूचनेनुसार कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी अंतरिम मागणीही केली गेली आहे.


या याचिकांपैकी एक शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे दाखल करण्यात आली असून दुसरी याचिका वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने