दारूच्या नशेत मुलाने ८० वर्षीय आईचा घेतला जीव!

कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे घडली आहे. दारूच्या व्यसनाने एका मुलाला इतके हैवान बनवले की, त्याने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईचा निर्घृण खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.


प्रभावती सोरफ असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा रवींद्र सोरफ यानेच हा क्रूर प्रकार केल्याचा आरोप आहे. रवींद्रला दारूचे व्यसन असून, रात्रीच्या वेळी आई आणि मुलामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या रवींद्रने थेट कोयता घेऊन आपल्या आईवर वार केले. त्याने डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला त्याने ओढत घरातल्या हॉलमध्ये आणले.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने कणकवली पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, प्रभावती सोरफ यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी रवींद्र सोरफ याला जागेवरून ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले की यामागे आणखी कोणते कारण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांनी 'KBC'चं अचानक शूटिंग बंद केलं; नेमकं कारण काय?

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह आणि लाडके महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि चिंता वाढवणारी

Thane News: दिवाळी पहाटनिमित्त ठाणे शहरामध्ये 'या' प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचे जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटोस

[caption id="attachment_1073309" align="alignnone" width="800"] 'सैराट' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली तरी आर्चीची क्रेझ काही संपता