कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून  परदेशी नागरिकांची लाखों रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे कॉल सेंटर प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. ते स्वतः अ‍ॅमेझॉन सपोर्ट स्टाफ असल्याचे भासवून आणि गिफ्ट कार्ड तसेच  क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळवण्यासाठी फिशिंग कॉल आणि फसव्या पद्धतींचा वापर करत होते.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, आणि त्यांचकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे गैरकृत्यासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी काही लोकांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत सीबीआयला परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे मोठ्या प्रमाणावर हाती लागले आहेत. याबरोबरच, सदर ठिकाणी तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

 
Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने