Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत आणि ओमान १९ सप्टेंबरच्या शुक्रवारी साखळी सामना रंगणार आहे. ओमानचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. यामुळे हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला एक आनंदाची बातमी कळली आहे.

आयसीसीच्या टी २० क्रिकेटच्या ताज्या रेटिंगनुसार भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. भारताकडे २७१ रेटिंग आहेत. फलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा अभिषेक शर्मा ८८४ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. गोलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुणने एकदम तीन स्थानांची झेप घेतली आहे.

एशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने १३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारत ३१ धावा केल्या होत्या तर वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २४ धावा देत फहीम अश्रफला पायचीत (LBW) केले होते. फहीम १४ चेंडूत ११ धावा करुन परतला होता. याआधी वरुणने यूएई विरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत चार धावा देत मोहम्मद झोहेबला बाद केले होते. मोहम्मद झोहेब पाच चेंडूत दोन धावा केल्यानंतर वरुणच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवकडे झेल देऊन परतला होता. वरुणने लागोपाठच्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली. याचा त्याला आयसीसी रेटिंगमध्ये फायदा झाला.

वरुण चक्रवर्ती फेब्रुवारी २०२५ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. मार्च २०२५ पासून न्यूझीलंडचा जेकब डफी टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आणि वरुण च्कवर्ती दुसऱ्या स्थानी अशी स्थिती झाली. अखेर आशिया कपमध्ये कामगिरीत सातत्य राखल्यामुळे वरुणच्या टी २० क्रिकेटच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम