याला म्हणतात जिगरबाज! ७६ वर्षांचा गुराखी वाघाशी भिडला आणि जिंकला!

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीट परिसरात ७६ वर्षांच्या गुराख्याने वाघाच्या हल्ल्याला तोंड देत स्वतःचा जीव वाचवला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. या थरारक झुंजीत गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सकाळी नेहमीप्रमाणे खांदला गावातील गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेलेले शिवराम गोसाई बामनकर (वय ७६) यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. परंतु, शिवराम यांनी घाबरून न जाता, मोठ्या हिंमतीने या हल्ल्याचा सामना केला. या दोघांमध्ये काही काळ झुंज सुरू होती. अखेरीस, शिवराम यांचा प्रतिकार जोरदार असल्याने वाघाला माघार घ्यावी लागली आणि तो जंगलात पळून गेला.


या हल्ल्यात शिवराम बामनकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात ते कसेबसे गावात पोहोचले आणि त्यांनी ही थरारक घटना कुटुंबीयांना व गावकर्‍यांना सांगितली. त्यानंतर, त्यांना तात्काळ राजाराम येथील आरोग्य पथकात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


दरम्यान, ७६ वर्षांच्या या गुराख्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराम यांच्या मुलीने, वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर यांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : शेत पाणंद रस्त्यांसाठी 116 कोटींचा निधी वितरित; दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra News: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांसाठी राज्य शासनाकडून 116 कोटी

MPSC : MPSC भरतीत मोठी वाढ; गट-कच्या आता 16,717 पदांसाठी परीक्षा, उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील

गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा लागवडीला शासनाची मान्यता, रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

मुंबई : राज्यातील दुष्काळी संकटात पशुधनाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चारा टंचाईची झळ

आर्थिक अडचणीमुळे एकही बालक शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे: आर्थिक संकटामुळे कोणत्याही निष्पाप बालकाचे उपचार थांबणार नाहीत. कॉक्लिअर इम्प्लांट आणि हृदय

गोकुळच्या चार शासकीय संचालकांच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी, मतदानाचा अधिकार देण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून

Dodamarg News: पश्चिम घाटातील जैवविविधता संशोधनाला मोठे यश; दोडामार्ग तालुक्यात ‘नाकाड्या चापड्या' या विषारी सापाची नव्याने नोंद

सिंधुदुर्ग: पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे संशोधन नुकतेच एका