अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन


बारामती : कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील १२ गावे-वाडीवस्त्यांवरील २ हजार ७३९ ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा उपलब्ध होणार आहे. त्यातील १ हजार ४१८ कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे.


कृषी आकस्मिक निधीतील ६ कोटी ६५ लक्ष रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही करंजे उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. या उपकेंद्रासाठी १८ किलोमीटर ३३ व ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्यात आली आहे. त्यात ११ केव्ही शेंडकरवाडी, मगरवाडी, माळवाडी या तीन कृषी वाहिन्या (फिडर) व सोमय्या, करंजेपूल या दोन गावठाण वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी या परिसरातील गावांचा भार ३३/११ केव्ही निबूत, वडगाव, मुरुम व मुर्टी या उपकेंद्रावर विभागलेला होता.


आता या नवीन करंजे उपकेंद्रामुळे शेंडकरवाडी, गायकवाडमळा, सोरटेवाडी, करंजे, चौधरीवाडी, माळवाडी, भापकरमळा, करंजेपूल, दगडेवस्ती. मगरवाडी, नाईकवाडी, शिवबाबा मंदिर गावे व वाडीवस्त्यांवरील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. त्यात घरगुती १ हजार १०८, वाणिज्य १९५ औद्योगिक १८ व कृषी १ हजार ४१८ अशा २ हजार ७३९ ग्राहकांना लाभ मिळणार आहे. याआधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करंजेपूल ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत २२ लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Bharat Gogawale : शेत पाणंद रस्त्यांसाठी 116 कोटींचा निधी वितरित; दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra News: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांसाठी राज्य शासनाकडून 116 कोटी

MPSC : MPSC भरतीत मोठी वाढ; गट-कच्या आता 16,717 पदांसाठी परीक्षा, उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील

गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा लागवडीला शासनाची मान्यता, रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

मुंबई : राज्यातील दुष्काळी संकटात पशुधनाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चारा टंचाईची झळ

आर्थिक अडचणीमुळे एकही बालक शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे: आर्थिक संकटामुळे कोणत्याही निष्पाप बालकाचे उपचार थांबणार नाहीत. कॉक्लिअर इम्प्लांट आणि हृदय

गोकुळच्या चार शासकीय संचालकांच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी, मतदानाचा अधिकार देण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून

Dodamarg News: पश्चिम घाटातील जैवविविधता संशोधनाला मोठे यश; दोडामार्ग तालुक्यात ‘नाकाड्या चापड्या' या विषारी सापाची नव्याने नोंद

सिंधुदुर्ग: पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे संशोधन नुकतेच एका