अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी कळविले आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आतापर्यंत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत.

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या संधीबाबतच्या सविस्तर सूचना ३ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात येणार आहेत. या फेरीमध्ये भाग-२ व प्राधान्यक्रम नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय देण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी या प्रवेश प्रक्रियेची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालकांमार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कुलाब्यातील शासकीय कार्यक्रमातून खासदार मिलिंद देवरांना डावलले; आयुक्त अश्विनी भिडेंना खरमरीत पत्र!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत रक्तरंजित घटना, दोन बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार; गोळी एकीच्या कानाला तर दुसरीच्या...

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये दोन तरूणींवर

Mumbai News: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवरील 'या' 5 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; कुणाला मिळणार सवलत?

मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेनेही प्रवाशांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण आणि छट

BDD Chawl: मूळ मुंबईकरांना मुंबईतच मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप

मुंबई: "मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना हक्काचं घर देण्याचं मोठं समाधान असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून कधीही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडीवासीयांना 557 कुटुंबीयांना घरांच्या चाव्यांचे वितरण!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर

BMC Ashray Yojana: मुंबईचा खरा हिरो सफाई कर्मचारी; त्यांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: राज्यात सध्या दिवाळीचे आनंदमय वातावरण सुरु आहे. गोरगरीब जनतेपासून नोकरदार वर्गापर्यंत सगळेजण दिवाळी