कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि त्याठिकाणी दोन नवीन पूल उभारणीला आता गती देण्यात येत असून या कामांसाठी आता महापालिकेने तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्प कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून या पुलांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यावतीने केला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने उत्तर मुंबईतील महत्त्वाच्या रस्ते जोडणी व पूल प्रकल्पांसाठी सुमारे २२०० कोटींची निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. याआधी विलंब झालेल्या या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता गती मिळाली आहे. या प्रकल्पांत रामचंद्र नाल्यावर पूल बांधकाम (एमडीपी रोड ते रायन इंटरनॅशनल स्कूलला जोडणारा), लगून रोड ते इन्फिनिटी मॉल जोडणारा पूल, तसेच महाकाली जंक्शन ते चारकोप नाका पर्यंत मालाड–मार्वे रोड रुंदीकरण व मीठ चौकीजवळील नाले सुधारणा या कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदाची जाहिरात महापालिका पूल विभागाने प्रकाशित केली आहे.

आगामी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मीठ चौकी व एव्हरशाईन नगर भागातील वाहतूक व्यवस्थापनासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर प्रकल्पांसह या प्रस्तावांचा नियमित आढावा घेत पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रक्रिया लवकर पूर्ण करून शक्य तितक्या लवकर कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी, हे प्रकल्प आता निविदा प्रक्रियेपर्यंत पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, महापालिकेने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निविदा काढल्या. यामध्ये कोस्टल रोडला मार्वे रोडशी जोडणारा नवीन ट्रॅफिक आर्म, तसेच दोन नवीन पूल उभारणीचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकल्प केवळ उत्तर मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील नागरिकांसाठीही लाभदायी ठरेल आणि प्रवास अधिक वेगवान व सुलभ होईल,असाही विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.MUNICIPAL
Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन