मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी सकाळी घेतल्या जाणाऱ्या पाण्याच्या नोंदीवर ठरला जातो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते, त्यातुलनेत ०१ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार सर्व धरणात केवळ ९८. ७० टक्के अर्थात १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजेच ३५९ दिवसाचा साठा जमा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख २८ हजार ५४९दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणी साठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळेकाही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवस धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील साठा जो २७ सप्टेंबर रोजी जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७सप्टेंबर रोजी या सर्व धरणातील पाणी साठा ९९.१३ टक्के एवढा होता, जो आता कमी होऊन ०१ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.

विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी पाण्याची पातळी घटल्यानंतर पाणीकपात लागू न करता पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि अपेक्षेपेक्षा तलाव धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडून ऑगस्टमध्येच सराव धरण काठोकाठ भरली गेली होती. त्यामुळे

०१ ऑक्टोबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणी साठा

सन २०२५ : ९८. ७० टक्के( १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर)

सन २०२४ : ९९.३७ टक्के ( १४ लाख ३८ हजार २२७ दशलक्ष लिटर)

सन २०२३ :९९.१८टक्के (१४ लाख ३५ हजार ४५९ दशलक्ष लिटर)
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म