अमेरिकेच्या टॅरिफनंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

मॉस्को : अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातविषयी वाद सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. पुतिन आगामी 5 व 6 डिसेंबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय भेट होणार आहे.


अमेरिकेबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या भारत भेटीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढू शकते. या भारत दौऱ्यापूर्वी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव देखील भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.


संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रात ( युएनजीए) सर्गेई लावरोव यांनी जाहीर केले की, डिसेंबरमध्ये रशियाचे अध्यक्ष भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी त्यांनी भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.त्यामध्ये व्यापार, लष्करी व तांत्रिक सहकार्य, वित्तीय व्यवहार, मानवीय विषय, आरोग्यसेवा, हाय-टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), आणि एससीओ व ब्रिक्सया आंतरराष्ट्रीय मंचांवरील समन्वय यांचा समावेश आहे.


लावरोव म्हणाले, “आम्ही भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचा पूर्ण आदर करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे हितसंबंध पुढे नेण्यासाठीचे परराष्ट्र धोरणही आम्हाला मान्य आहे. आम्ही भारताशी उच्च पातळीवर सातत्याने संपर्कात असतो.” रशियन तेलाच्या आयातीवरून अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफबाबत बोलताना लावरोव म्हणाले, “भारत आणि रशियाची आर्थिक भागीदारी धोक्यात नाही. पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की भारत आपल्या भागीदारांची निवड स्वतः करतो.” लावरोव पुढे म्हणाले, “जर अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार वाढवण्याबाबत अमेरिकेच्या काही अटी असतील, तर आम्ही त्या अटींवर चर्चा करण्यास तयार आहोत. पण जेव्हा विषय भारत आणि तिसऱ्या देशामधील असतो, तेव्हा भारत फक्त संबंधित देशांसोबतच चर्चा करण्याला प्राधान्य देतो.”

Comments
Add Comment

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा भीषण हवाई हल्ला ! 40 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाच्या हवाई हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जपोरिझ्झिया भागातील कोमिशुवाखा गावात 2

Benjamin Netanyahu : बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलला केले सावध; विरोधकांवर गंभीर आरोप करताना म्हणाले, बाहेर इराण, तर देशात...

Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत

Google : गुगलचा धक्कादायक निर्णय! 5 देशांत स्वेच्छानिवृत्ती जाहीर; नोकऱ्या सोडून AI वर लावणार पैसा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुगलने

US Stock Market : डेमोक्रॅट्सच्या विजयानंतर अमेरिकी शेअर बाजारात मोठी तेजी; डाऊ जोन्स 1,569 अंकांनी वधारला

International Business News: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये