सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. आज सुप्रीम कोर्ट परिसरात त्यांच्यावर झालेला हा हल्ला प्रत्येक भारतीयाला चीड आणणारा आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांसाठी कोणतेही स्थान नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.


 


दरम्यान, सरन्यायाधीश यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने तात्काळ निलंबित केलं आहे. निलंबनाच्या काळात त्यांना कोणत्याही न्यायालय, ट्रिब्युनल किंवा अधिकरणात हजर राहण्याची, वकिली करण्याची किंवा केस चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही.


बीसीआय ने राकेश किशोर यांचा वकिलीचा परवाना रद्द केला असून, या प्रकरणी अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यांना १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी ही कारवाई का सुरू ठेवू नये हे स्पष्ट करावं लागेल. त्यांच्या उत्तरानंतर आणि तपासाच्या आधारावर कौन्सिल योग्य तो निर्णय घेईल.


दुसरीकडे, सीजेआय बी. आर. गवई यांनी स्वतः राकेश किशोरविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ सूत्रांनुसार,सीजेआय यांनी रजिस्ट्री अधिकाऱ्यांना सांगितले की, या घटनेकडे उपेक्षेने पाहावं आणि दुर्लक्षित करावं.जेवणाच्या सुट्टीत, सीजेआय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, सुरक्षा प्रमुख व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्कता वाढवण्यावर चर्चा केली.


वकील राकेश किशोर याने सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला आणि जोरात ओरडला, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही!” त्याला तत्काळ कोर्ट परिसरात ताब्यात घेण्यात आलं. मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांनी त्याची कोर्टातच सुटका केली. हा जोडा न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्याकडे गेला पण त्यांना लागला नाही. नंतर किशोरने कबूल केलं की, हा हल्ला सीजेआय गवई यांच्यावरच होता, आणि न्यायमूर्ती चंद्रन यांची माफीही मागितली.

Comments
Add Comment

Blinkit Ambulance Service : बिगर-आणीबाणीच्या प्रवासासाठी आता २५०० रुपये शुल्क

ब्लिंकिट ॲम्ब्युलन्स (Blinkit Ambulance) या मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या उपक्रमाने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

Amit Shah on Rahul Gandhi: राहुल गांधींना अमित शाहांचा जोरदार पलटवार; संसदेत चर्चेचे खुले आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चर्चेचे आव्हान दिले होते. या आव्हानावर आता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये उद्रेक; आंदोलकांवर पाक लष्कराचा बेछूट गोळीबार, घरांवर ड्रोन हल्ले! तीन जण ठार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. तिथल्या नागरिकांनी

९ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू; वर्गात असताना अचानक कोसळली

Delhi: दिल्लीयेथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी

प्रेमविवाहानंतर पती पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला, परत आला तेव्हा पत्नीला खुर्चीला बांधलं आणि...

संशयाला काही औषध नसतं असं म्हंटलं जातं. एकदा संशय घेण्यास सुरूवात झाली की मग काही केल्या मनातून जात नाही. या

Uttarakhand accident : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! इनोव्हा कार नदीत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता

गंगोत्री : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला.