पाकिस्तानी लष्काराच्या या कारवाईत बेछुट गोळीबार आणि ड्रोन बॉम्ब हल्ले केले जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्ल्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर 18 जण जखमी झाले आहेत. ही घटना रावलकोटमधील उमर फारूक चौकात घडली. लष्काराकडून पहाटे पाच वाजल्यापासून अमानुषपणे गोळीबार केला जात आहे.स्थानिकांच्या मते, पाकिस्तानी लष्कर जाणीवपूर्वक नागरिकांची घरं आणि नि:शस्त्र आंदोलकांना लक्ष्य करत आहे. जून 2026 पासून सुरू असलेल्या या कारवाईत पाकिस्तान लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 153हून अधिक जणांना ठार केलं आहे.
November 5, 2026 | Rawalakot, POJK
Pakistan forces have launched drone strikes in Rawalakot, Kashmir.
All mobile networks and internet services have been completely shut down.
The city is gripped by fear and chaos, with dozens killed and injured. https://t.co/RQjdfqCtlR
— برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) November 5, 2026
संशयाला काही औषध नसतं असं म्हंटलं जातं. एकदा संशय घेण्यास सुरूवात झाली की मग काही केल्या मनातून जात नाही. या संशयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचं ...
रावलकोटमधील सरकारी मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले होत असले तरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उमर फारूक चौकात उपस्थित असलेल्या महिलांनी आपले आंदोलन सुरूच ठेवलं आहे. जीव गेला तरी जागा सोडणार असं भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे.