शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभराच्या पगाराचा धनादेश 31,18,286 सुपूर्द केला आहे. ही रक्कम राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेच्या मदतीसाठी समर्पित केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शक्य ती मदत करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, नागरिक म्हणून आपणदेखील पुढे येऊन हातभार लावणे गरजेचे आहे.


माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे. अश्या भावना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी सदस्य उपस्थित होते. मंत्री महाजन यांच्या या निर्णयाचे जामनेरात तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व जनतेकडून स्वागत होत आहे.

Comments
Add Comment

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली