पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (3 नोव्हेंबर- मंगळवार) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरनिंग द्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी पुणेकरांना संबोधन सुद्धा करणार आहेत.
त्यानंतर, ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3 चे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्चून उभारलेला हा प्रकल्प तांत्रिक नवोन्मेष आणि आधुनिक वाहतूक उपाय योजनांच्या माध्यमातून पुण्याच्या नागरी दळणवळण पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प, एक महत्वाचे पाऊल असेल.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सोन्या-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या ...
तब्बल 23 किमी लांबीची ही पिंक लाईन माण ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक पर्यंत असेल. या मेट्रो मार्गिकेमुळे हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगर येथे नोकरीला असणाऱ्या नोकरदारांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एका ठिकाणी पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. शिवाय, हजारो आयटी व्यावसायिक आणि इतर प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होणार आहे. माण ते जिल्हा न्यायालयापर्यंत धावणारी ही मेट्रो मार्गिका, सध्याच्या मेट्रो नेटवर्कशी जोडली जाणार असून, त्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये अखंडित मेट्रो संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल.
पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, ही मेट्रो सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. खासगी वाहनांची वाहतूक कोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे तसेच प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ करणे, यासाठी या मेट्रो मार्गिकेची मदत पुणेकरांना होणार आहे. पिंक लाईनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आलेला आहे. या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या पूर्णपणे महिला चालकांकडून चालवल्या जाणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
मुंबई: राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. राज्य सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता सरकारने दुष्काळ ...
या प्रकल्पात पर्यावरणीय शाश्वततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रकल्पाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे 30 टक्के वीज सौरऊर्जेतून मिळवण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही करणार आहेत. तब्बल 13,500 कोटी रुपये खर्चून हा टप्पा विकसित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या 2अ, 2ब, 4 आणि 4अ या मार्गिकांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असून, त्यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारेल आणि महत्त्वाच्या निवासी, व्यावसायिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधली संपर्कव्यवस्था अधिक मजबूत होईल. दुसऱ्या टप्प्यातल्या 2अ आणि 2ब या मार्गिकांची एकूण लांबी सुमारे 12.75 किलोमीटर इतकी आहे.
2 अ ही मार्गिका वनाज ते चांदणी चौक, तर 2ब ही मार्गिका रामवाडी ते विठ्ठलवाडी यांना जोडेल. त्यामुळे सध्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो जाळ्याचा विस्तार होईल. सुमारे 25.52 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4 खराडी ते खडकवासला यांना जोडेल. तर 6.12 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4 अ नळ स्टॉप ते माणिकबाग यांना जोडेल. या नव्या मेट्रो मार्गिकांमुळे खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, माणिकबाग, नांदेड सिटी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वारजे यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील. रामवाडी ते विठ्ठलवाडी या पूर्वेकडच्या विस्तारित मार्गिकेमुळे खराडी आणि वाघोली इथल्या झपाट्याने विकसित होत असलेल्या निवासी, व्यावसायिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांशी संपर्क अधिक सुलभ होईल.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची एका दिवसात चांदी झाली. कारण सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरला. कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी ...
स्वारगेट, नळ स्टॉप आणि खराडी बायपास इथल्या अदलाबदल सुविधांद्वारे या मार्गिका आंतरशहरी बससेवा आणि सध्याच्या पुणे मेट्रो जाळ्याशी जोडल्या जातील. त्यामुळे शहराच्या विविध भागांदरम्यान विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल. या प्रकल्पांमुळे पुण्यातली सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होईल, शहरातल्या विविध भागांमधली कनेक्टीव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना कार्यक्षम तसेच एकात्मिक शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.