अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार स्फोटाच्या आवाजानंतर एक घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक जण जखमी झाले असून, त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

गावातील रहिवासी रामकुमार ऊर्फ पारसनाथ हे गावाबाहेर एक घर बांधून राहत होते. गुरुवारी संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता अचानक जोरदार आवाजासह घर कोसळले. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर, एसपी सिटी चक्रपाणी त्रिपाठी आणि सीओ अयोध्या यांनी घटनास्थळी भेट दिली.

?feature=share

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अनेक जखमींवर उपचार सुरू असून, त्यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोट फटाक्यांमुळे झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, घटनास्थळी इंधनाच्या गॅसचा वास देखील येत असल्याने तपास सुरू आहे.काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य सुरू असून, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.--
Comments
Add Comment

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांनी वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन्सला दाखवला हिरवा झेंडा

वाराणसी: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 31 ऑक्टोबर 2026 रोजी,

Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

पंजाब: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका रस्ते अपघातामध्ये,

नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात

नवी दिल्ली: दिल्ली क्राइम ब्रँचने खोटी नाणी बनवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. दिल्लीच्या क्राइम ब्रँचने 20

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व

Ujjain Hotel Tragedy : हॉटेलमधील टाकीत विषारी वायूची गळती! स्वच्छता करताना 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; परिसरात खळबळ

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. देवास रोडवरील एका हॉटेलमध्ये अन्नकचरा

आंध्र प्रदेशावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 100 किमी वेगाने वारे; 'मुरासू' कधी धडकणार?

Murasu Cyclone: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा