आंध्र प्रदेशावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 100 किमी वेगाने वारे; 'मुरासू' कधी धडकणार?

बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, त्याला 'मुरासू' असे नाव देण्यात येणार आहे. 3 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता असून, ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Murasu Cyclone: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असून, 2 नोव्हेंबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ 3 नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संभाव्य चक्रीवादळामुळे ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या वादळाची तीव्रता आणखी वाढल्यास त्याचे भीषण चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या चक्रीवादळाला 'मुरासू' (Murasu) असे नाव दिले जाणार आहे. तमिळ भाषेत 'मुरासू' म्हणजे नगारा किंवा ढोल असा अर्थ होतो. या वादळाचे नाव भारताने सुचवले आहे.



बंगालच्या उपसागरात वादळाची तीव्रता वाढतेय!


IMD च्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ताशी 30 किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने सरकत होते. त्यावेळी हे क्षेत्र चेन्नईपासून सुमारे 960 किलोमीटर, विशाखापट्टणमपासून 980 किलोमीटर आणि मच्छलीपट्टणमपासून 1,030 किलोमीटर अंतरावर होते. या प्रणालीचे 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता होती. त्यानंतर 1 नोव्हेंबरला चक्रीवादळ आणि 2 नोव्हेंबरपर्यंत तीव्र चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा


या संभाव्य चक्रीवादळामुळे 2 नोव्हेंबरला किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानम येथे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरलाही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायलसीमा भागातही 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात देशातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2026 हा 1901 नंतर देशातील सरासरी कमाल तापमानाच्या दृष्टीने सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर ठरल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक'!

नवी दिल्ली : देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त

Narendra Modi: एकता नगरचे भव्य वर्षावन; बाराही महिने मान्सूनचा अनुभव आणि काचेचा स्कायवॉक

[caption id="attachment_1070988" align="aligncenter" width="800"] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर (केवडिया) येथे एका भव्य आणि

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणीच्या कलाकुसरीचे केले कौतुक

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43