नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३८ जणांना नामांकन मिळाले आहे. ज्यात २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नामांकन मिळाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार का? अशी चर्ची सर्वत्र आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार सांगितले आहे की, ते या पुरस्काराचे पात्र आहेत. कारण, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धासह इतर सात युद्धे रोखली आहेत. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प हटून बसल्याने जागतिक चर्चेचा विषय झाला आहे. ट्रम्पप्रमाणेच या शर्यतीमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि पोप फ्रान्सिस (ज्यांचे एप्रिलमध्ये निधन झाले) यांचा समावेश आहे. त्यामुळे २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारावर कोणाचे नाव आहे, याची उत्सुकता जागतिक पातळीवर आहे.


शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो?
१९०१ ते २०२४ या कालावधीत एकूण १४२ व्यक्ती आणि संस्थांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ज्यापैकी १११ व्यक्ती आणि ३१ संस्थांचा समावेश आहे. हा पुरस्कार ज्यांच्यामुळे दिला जातो, त्या अल्फ्रॅड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार, राष्ट्रांमधील बंधुत्वासाठी, स्थायी सैन्यांचे उच्चाटन किंवा घट करण्यासाठी आणि शांतता परिषदांचे आयोजन आणि प्रोत्साहन देणे असे पुरस्काराचे निकष आहेत. यावर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे हा पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

पंजाब: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका रस्ते अपघातामध्ये,

नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात

नवी दिल्ली: दिल्ली क्राइम ब्रँचने खोटी नाणी बनवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. दिल्लीच्या क्राइम ब्रँचने 20

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व

Ujjain Hotel Tragedy : हॉटेलमधील टाकीत विषारी वायूची गळती! स्वच्छता करताना 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; परिसरात खळबळ

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. देवास रोडवरील एका हॉटेलमध्ये अन्नकचरा

आंध्र प्रदेशावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 100 किमी वेगाने वारे; 'मुरासू' कधी धडकणार?

Murasu Cyclone: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा

महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक'!

नवी दिल्ली : देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट