प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. अरमान आपल्या दोन्ही पत्नींसोबत एकाच छताखाली राहत असल्यामुळे त्याने हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.


अरमान मलिकने आता भारत सोडून दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे त्याने रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला आहे. तर दुबईला जाण्यावरुन तो म्हणाला की, दुबईमध्ये दोन बायका एकत्र असणे कायदेशीर आहे. त्यामुळे त्याला तेथे कोणत्याही कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. त्याच्या या निर्णयाशी त्याची दुसरी पत्नी कृतिका देखील पूर्णपणे सहमत आहे. दरम्यान अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी घटस्फोटाच्या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही.


काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने अमान मलिकला त्याच्या एका पत्नीला घटस्फोट देण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेले असते. त्यामुळे त्याने पहिली पत्नी पायलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असून दुसरी पत्नी कृतिका मलिकसोबत आपले जीवन सुरू ठेवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.


कोण आहे अरमान मलिक?
अरमान मलिका हा मुळचा हरियाणाचा असून तो प्रसिद्ध युट्यूबर आहे. बीग बॉस सिझन ३ मधील त्याच्या खेळामुळे तो अधिक प्रसिद्धीस आला. २०११ मध्ये त्याने पायल मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर सहा वर्षांनी त्याने कृतिका मलिकसोबत लग्न केले. अरमानला पायलपासून तीन मूलं आहेत. तर कृतिकापासून एक मुलगा आहे. हे संपूर्ण कुटूंब एका छताखाली राहते. त्याच्या युट्यूब वाहिनीचा मुळ विषय हा फॅमिली व्लोगिंग आहे.

Comments
Add Comment

Janhvi Kapoor: हॅलोविनला जान्हवी कपूरचा 'नगिना' अवतार! आई श्रीदेवींच्या आयकॉनिक लूकला खास मानवंदना

या वर्षीच्या हॅलोविनला बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या आई आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी

Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

पंजाब: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका रस्ते अपघातामध्ये,

Lalit Prabhakar viral photos: पांढऱ्या शर्टमधील ललित प्रभाकरचा साधा पण रुबाबदार लूक व्हायरल; चाहत्यांच्या नजरा हटेनात!

[caption id="attachment_1071120" align="alignnone" width="850"] मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या नव्या लूकमुळे

दोन भाऊ, एक अतूट नातं! ‘बंधू’चा भावनिक ट्रेलर रिलीज; प्रदर्शनाची तारीखही ठरली

'भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून व्यक्त झालेलं भावाचं नातं असंच काहीसं

Sanjay Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 Sanjay Gupta : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’

'रोजा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे चेन्नईत निधन; सिनेसृष्टी शोकसागरात

भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि विशेषतः दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर एक मोठा आघात झाला आहे. गाजलेला चित्रपट 'रोजा' फेम