१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अवैधरीत्या चिनी फटाके आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, सुमारे १० कोटी रुपये किमतीचे तब्बल १.३० लाख फटाके जप्त करण्यात आले आहेत.


'ऑपरेशन फायर ट्रेल' या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, देशातील दोन प्रमुख बंदरांवरून ही तस्करी उघडकीस आली आहे.


डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात चीनहून आलेल्या एका कंटेनरची कसून तपासणी केली. यामध्ये वरच्या थरावर कपडे ठेवले होते, पण खोलवर पाहणी केल्यानंतर ४६,६४० चिनी फटाके आढळून आले. या खेपाची अंदाजित किंमत ४.८२ कोटी रुपये आहे.


तपासाअंती या तस्करीमागे असलेल्या टोळीचा शोध लागला असून, गुजरातमधील वेरावळ येथे एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या ताब्यातून बेकायदेशीर कागदपत्रे आणि साठवणूक यंत्रणेचे पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत.


याचप्रमाणे, तुतिकोरिन बंदरावर देखील डीआरआयने दुसऱ्या कारवाईत ८३,५२० चिनी फटाके जप्त केले आहेत. या फटाक्यांना 'इंजिनिअरिंग गुड्स' म्हणून चुकीचं लेबल लावून देशात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. हे फटाके सिलिकॉन सीलंट गनच्या झाकणाखाली लपवण्यात आले होते. ही खेप सुमारे ५.०१ कोटी रुपये किमतीची होती.


अशा प्रकारच्या बेकायदेशीर आयातीवर बंदी आहे. विदेश व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात प्रतिबंधित असून, त्यासाठी डीजीएफटी आणि पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मान्यतेची आवश्यकता असते.


अशा धोकादायक वस्तूंची आयात केवळ कायदाविरोधीच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका ठरू शकते. डीआरआयच्या या सतर्क कारवाईमुळे, सणासुदीच्या काळात देशात अवैध चिनी फटाके पोहोचण्यापासून रोखण्यात यश मिळालं आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक'!

नवी दिल्ली : देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त

Narendra Modi: एकता नगरचे भव्य वर्षावन; बाराही महिने मान्सूनचा अनुभव आणि काचेचा स्कायवॉक

[caption id="attachment_1070988" align="aligncenter" width="800"] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर (केवडिया) येथे एका भव्य आणि

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणीच्या कलाकुसरीचे केले कौतुक

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43