प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणीच्या कलाकुसरीचे केले कौतुक

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटनवैभवाचे दर्शन घडविणारे आकर्षक दालन उभारले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दालनाला भेट देत महाराष्ट्राच्या पारंपरिक कला आणि हस्तकलेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पैठणी साड्यांची पाहणी केली. पैठणी विणकामातील बारकावे, पारंपरिक तंत्र आणि त्यामागील कलाकुसरीबाबत त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या दालनात महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, पारंपरिक कला, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या भेटीप्रसंगी पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने त्यांचे स्वागत केले.



राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ अंतर्गत १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान केवडिया येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राच्या विविध पर्यटनस्थळांची आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख करून दिली जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनात राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके, पर्यटनविषयक साहित्य, पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन ही प्रमुख आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर यांच्या किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचेही सादरीकरण केले जात आहे. याशिवाय, राज्यातील लोककला आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


गड-किल्ले, ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, साहसी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन अशा महाराष्ट्रातील पर्यटनाच्या विविध पैलूंची माहिती या दालनातून दिली जात आहे. पैठणी विणकामासारख्या पारंपरिक वस्त्रकलेसोबतच स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि लोकसंस्कृतीच्या माध्यमातून राज्याचे सांस्कृतिक वैभव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळण्यासह स्थानिक कलाकार, कारागीर आणि पर्यटन व्यवसायालाही प्रोत्साहन मिळणार आहे.



पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, समृद्ध संस्कृती, खाद्यपरंपरा आणि पर्यटन क्षेत्रातील संधी देशभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट देऊन राज्याच्या कला, संस्कृती आणि पैठणी विणकामाची माहिती घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.


पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर राज्याचे पर्यटनवैभव सादर करीत आहे. केवडिया येथील भारत पर्वच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला आणि खाद्यसंस्कृती देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार असून, देशभरातील पर्यटकांचे लक्ष महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे वेधले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43

उत्तराखंड रन फॉर युनिटी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या घोषणा; पीआरडी जवानांचे मानधन वाढणार, प्रत्येक ग्रामपंचायतीत क्रीडा क्लब!

[caption id="attachment_1070936" align="aligncenter" width="800"] राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देहरादून येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर ‘रन फॉर युनिटी’ या

El Nino ची पाठ फिरताच 2027 मध्ये येणार La Nina चं महासंकट; अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा

जगभरातील हवामानाचे चक्र वेगाने बदलत असून आता एक नवीन आणि अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. एल निनोचा प्रभाव ओसरत

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना

Delhi Fire : दिल्लीत मंगोलपुरी येथील कारखान्याला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Delhi News: दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पादत्राणे बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री

ISRO : इस्रोची मोठी कामगिरी! भारताचा NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी भारताचा पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03