किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या तारखेपासून ५ वर्षांवरून जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवला आहे. जवळपास ७ वर्षांची नवीन विस्‍तारित वॉरंटी मुदत किया सेल्‍टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्‍सच्‍या नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी आहे, ज्‍यांच्‍याकडे सध्‍या ५ वर्षांची वॉरंटी आहे. आधीच ५-वर्षांच्‍या विस्‍तारित वॉरंटीचा अवलंब केलेले विद्यमान किया ग्राहक ३२१७० रूपयांपासून (कर वगळून) सुरू होणाऱ्या ५+२-वर्ष कव्‍हरेजमध्‍ये अपग्रेड होऊ शकतात. नवीन ग्राहकांसाठी ७ वर्ष विस्‍तारित वॉरंटी ४७२४९ रूपयांपासून (कर वगळून) उपलब्‍ध आहे. देशभरातील कोणत्‍याही अधिकृत किया डिलरशिपमध्‍ये ७-वर्ष विस्‍तारित वॉरंटीचा आनंद घेता येऊ शकतो.


किया इंडियाच्‍या विक्री व विपणनाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले,'किया इंडिया ग्राहकांसाठी फायदे वाढवण्‍याप्रती आणि परिपूर्ण मन:शांतीची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आमचे वॉरंटी कव्‍हरेज नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवत आम्‍ही आमच्‍या वेईकल्‍सचा टिकाऊपणा व दर्जावरील आत्‍मविश्वासाची खात्री देतो, तसेच आमच्‍या अधिकृत सर्विस नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सतत पाठिंबा देत आहोत. हा उपक्रम प्रत्‍येक किया ग्राहकाला अपवादात्‍मक मालकीहक्‍क अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य देण्‍याप्रती आमच्‍या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे.''


कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की विविध उपक्रम आणि सर्वोत्तम प्रोग्राम्‍सच्‍या माध्‍यमातून किया इंडियाने सतत सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेचे पालन केले आहे, जेथे विशेषत: देखभाल खर्च आणि भावी रिसेल शक्‍यतेसंदर्भात उत्तम मन:शांती देत आहे.

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं; पती राज निदिमोरूच्या 'त्या' कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले

Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.