‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८ ऑक्टोबरच्या रात्री आंध्रप्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ धडकण्याचा अंदाज आहे. सोमवारी रात्री जारी केलेल्या हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ मोंथा गेल्या सहा सहा तासात साधारण १३ किलोमीटर प्रतितासाच्या गतीने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.


'मोंथा'मुळे विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता


'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही भागात मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाकडून या भागात 'यल्लो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.


वैज्ञानिक प्रवीण कुमार (प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर) यांनी सांगितले की, 'मोंथा' चक्रीवादळ पश्चिम-मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या भागातून उत्तर-वायव्येकडे सरकले आहे, ज्यामुळे या प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


५ राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात


मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. वाढता धोका पाहता सरकारने पाचही बाधित राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शाहिदी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, आतापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि छत्तीसगडमधील सर्व बाधित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा