रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक



मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी विभागात मुख्य मार्ग व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ वाजल्यापासून ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ वाजल्यापासून ते दुपारी ३. ३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. हार्बर मार्गावर हा ब्लॉक कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते संध्याकाळी ४ . १० या वेळेत ब्लॉक राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३४ ते दुपारी ३ . ३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून १०.१७ ते दुपारी ३. ४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला तसेच पनवेल वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर