कोस्टल रोडवरील वायूवीजनमध्ये सुधारणा, वाढला ३० कोटींचा अतिरिक्त खर्च

बोगद्यातील हवा खेळती आणि तापमान संतुलित राखण्यासाठी घेतला निर्णय


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वायूविजन व्यवस्थेत बदल केल्यामुळे तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च वाढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांतर्गत बांधलेल्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ सकार्डो नोझल प्रकारची वायूवीजन व्यवस्था करण्यात आली होती. परंतु जमिनीवर कुठलेही बांधकाम करण्यास निर्बंध असल्यामुळे उभ्या प्रकारच्या शाफ्ट बसवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे या ऐवजी दुहेरी नोझर बसवण्यात आले. वायूवीजन पंखे दोन्ही दिशेने चालतील असे बनवले गेले, जेणेकरून आगीच्या प्रसंगी व द्विमार्गी वाहतुकीस ते कार्यक्षम राहत आहेत.


मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण प्रिन्सेस स्ट्री उड्डणपूल ते वांद्रे वरळी सेतूच्या वरळी भागातील टोक या कामातील भाग चार अंतग्रत प्रकल्पातील बोगद्यांत सुधारीत वायूवीजन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पातील बोगद्यातील प्रणालीमध्ये सकार्डो नोझर प्रकारची वायूवीजन व्यवस्था फक्त बोगद्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली होती. या व्यवस्थेमध्ये ताज्या हवेच्या प्रवोशद्वारावर करण्यात आली होती. या व्यवस्थेमध्ये ताज्या हवेच्या प्रवेशासाठी उभ्या प्रकारच्या शाफ्ट बसवण्यात येणार होता. पण जमिनीवर कुठलेजही बांधकाम करण्यास निर्बंध असल्यामुळे उभ्या प्रकारचा शाफ्ट करणे शक्य झाले नाही. त्योएवजी बोगद्याच्या रँपमधून हवा खेचण्यासाठी बोगदा आणि कट अँड कव्हर यांच्या जंक्शनवर सकार्डो नोझर बसवण्यात आले होते. त्यामुळे बोगद्यातील वायूवीजन प्रणाली कार्यक्षम बनवण्यासाठी बदल करण्यात आला आहे.


आपत्कालिन स्थितीत अर्थात आगीच्या वेळेस धूर उलट्या दिशेने जाऊ नये याकरता पंखे दोन्ही दिशेने करण्यात आले आहे. आगीच्या घटनांमध्ये बोगद्यातील उच्च तापमान सहन करण्यासााठी आग क्षमता २५० अंश सेल्सियसवरून ४०० अंश सेल्सियस करण्यात आली आहे. पंख्याचा आकार आणि क्षमता वाढवल्यामुळे व्हेरिएबल वारंवारता ड्राईव्ह पॅनेल क्षमता वाढवावी लागली. त्यामुळे वायूवीजनवरील खर्च विविध करांसह ३०.२१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च आता १४ हजार ८०९ कोटींवर जावूना पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या