Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इस्लामाबाद येथील हायकोर्टाजवळ (High Court) एका कारमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या या आत्मघातकी हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की, स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. या भीषण घटनेत अनेक लोक जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी हायकोर्टाचा परिसर सील केला आहे. भारताची राजधानी दिल्लीत कार स्फोट झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या राजधानीत झालेला हा आत्मघातकी हल्ला जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरला आहे. दोन्ही देशांच्या राजधानी शहरांमध्ये झालेल्या या स्फोटांमुळे दहशतवादाचे सावट आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक गडद झाल्याचे स्पष्ट होत आहे.



न्यायालयीन संकुलाबाहेर 'आत्मघातकी' बॉम्बस्फोट


सेक्टर जी-११ मधील न्यायालयीन संकुलाबाहेर (Court Complex) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी हा शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला हा स्फोट एका कारला जोडलेल्या गॅस सिलिंडरमुळे झाल्याचे बोलले जात होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारमध्ये असलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्याने हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्यामुळे न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठी दहशत निर्माण झाली आहे.



न्यायालयीन संकुलाजवळच्या हल्ल्यात १२ निष्पाप ठार


या भीषण आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. तसेच, २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी हा हल्ला झाल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि देशातील सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने या स्फोटाबाबत माहिती देताना सांगितले की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता, कारण या स्फोटाचा आवाज तब्बल ६ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. या घटनेनंतर अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेह विखुरलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अधिराऱ्यांनी आणि स्थानिकांना जखमींना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.



इस्लामाबाद स्फोटानंतर तपासाला वेग


शक्तिशाली स्फोटाची तीव्रता लक्षात घेता, या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भीषण घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. स्फोट होताच न्यायालयीन संकुल आणि आजूबाजूचे सर्व महत्त्वाचे रस्ते तात्काळ बंद करण्यात आले आहेत. सध्या या स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम (Forensic Team) घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा हल्ला दहशतवादी होता की नाही, यावर पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, न्यायालयीन संकुलाजवळ झालेला हा स्फोट पाहता, पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या घटनेनंतर तातडीचा उपाय म्हणून इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित देण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही