राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या तीनही दिवसात हे कला प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मुंबईतील निसर्गसौंदर्याचे अभ्यासक, जाणकार आणि निरनिराळ्या कलांची आवड जोपासणाऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन हे अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. या प्रदर्शनात जपानी संस्कृतीतील सूक्ष्म व संयमशील कलांचे दर्शन मुंबईकरांना घडणार आहे. या कला प्रदर्शनासाठी बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो-जॅपनिज असोसिएशन व ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभणार आहे.

‘बोन्साय’ या लघुवृक्ष संवर्धन कलेसोबतच ‘ओरिगामी’ म्हणजेच कागदाच्या घड्या घालून नवनवीन कलाकृती साकारण्याची पारंपरिक जपानी कला या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे. मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन म्हणजे निसर्ग आणि कलेचा एकत्र उत्सव ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
Comments
Add Comment

Fake PMO officer arrested Mumbai : PMO बनावट आयडी आणि शस्त्रासह घुसणाऱ्या दोघांना अटक; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याशी संबंध नसल्याचा पोलिसांचा खुलासा

मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात' (NMACC) सुरक्षेचा

FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाकडून IRCTC अंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची

Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video

मुंबई: कायमच सुसाट धावणाऱ्या कोस्टल रोडवर काही वेळापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही

Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद

कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा

PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बनावट PMO अधिकाऱ्याचा रुबाब; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात

ASK Private Wealth Hurun India Cheetah Index : भारतातील 'चीता' स्टार्टअप्सची लाट! Hurun India रिपोर्टमध्ये ११० कंपन्यांची बाजी; बेंगळुरू ठरले नंबर १!

मुंबई : भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात 'युनिकॉर्न' (Unicorn) बनण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सची नवी