WhatsApp Scam: व्हॉट्सॲपवर पैसे कमावण्याचा मेसेज येतोय? सावधान! एका चुकीमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं

व्हॉट्सॲप वर भरघोस कमाईचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जात आहे. जर तुम्हालाही असा एखादा संदेश मिळाला किंवा अशी जाहिरात दिसली, तर... सावध रहा अशा सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका.

मुंबई: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहेत. WhatsApp वर घरबसल्या पैसे कमावण्याची संधी, पार्ट टाइम जॉब किंवा ऑनलाइन टास्कच्या नावाखाली आकर्षक मेसेज पाठवले जात आहेत. सुरुवातीला छोट्या कामांच्या बदल्यात पैसे देऊन विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर मोठ्या कमाईचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली जाते. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन गृह मंत्रालय आणि सायबर यंत्रणांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे WhatsApp वर येणाऱ्या अनोळखी मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.



नेमकी फसवणूक कशी होते?


1.अनोळखी नंबरवरून WhatsApp वर मेसेज येतो. घरबसल्या पैसे कमावण्याची संधी असल्याचं सांगितलं जातं.
2.YouTube व्हिडीओला लाईक करणे, हॉटेलला रेटिंग देणे किंवा ऑनलाइन रिव्ह्यू लिहिणे अशी छोटी कामं दिली जातात.
3.सुरुवातीला काही पैसे देऊन विश्वास संपादन केले जाते.
4.त्यानंतर जास्त कमाईसाठी पैसे गुंतवण्यास सांगितले जाते.
5.पैसे जमा केल्यानंतर अधिक रक्कम मागितली जाते किंवा पैसे काढता येत नाहीत.


"व्हॉट्सॲपचा वापर करून तुम्ही मोठी कमाई कशी करू शकता?" सोशल मीडियासह विविध ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती कदाचित पाहायला मिळत  असतील. भारतात व्हॉट्सॲप फ्रॉड आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.ज्यामध्ये दरमहा सरासरी ९० लाख ते १ कोटी भारतीय व्हॉट्सॲप खाती संशयास्पद हालचालींमुळे बॅन केली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, 'अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कमाईच्या ऑफरची पडताळणी करावी.
अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत. पैसे पाठवण्यापूर्वी UPI वर दिसणाऱ्या प्राप्तकर्त्याच्या नावाची तपासणी करावी. संशयास्पद आर्थिक व्यवहारांपासून दूर राहावे.' (WHATSAPP SCAM)




WhatsApp अकाउंट भाड्याने घेण्याचा नवा प्रकार


राष्ट्रीय सायबर क्राईम यंत्रणेने WhatsApp Web Account Renting Scam बाबतही सावध केले आहे.
यामध्ये नागरिकांना WhatsApp अकाउंट लिंक केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवले जाते. त्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते.
मात्र, असे केल्याने अनोळखी व्यक्तीला तुमच्या WhatsApp अकाउंटचा ॲक्सेस मिळू शकतो. त्यानंतर तुमच्या अकाउंटचा वापर इतर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.(YOUTUBE LIKE AND SUBSCRIBE TASK)



व्हॉट्सॲप फसवणुक झाली तर कशी काळजी घ्यावी?


1.अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका.
2.कोणालाही OTP किंवा बँक खात्याची माहिती देऊ नका.
3.अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका.
4.WhatsApp अकाउंट लिंक करण्यासाठी अनोळखी QR कोड स्कॅन करू नका.




फसवणूक झाल्यास काय करावे?


तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल वर तक्रार नोंदवावी. जो काही फ्रॉड झाला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. संबंधित बँकेलाही त्वरित कळवावे.


Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ आकाराला; 1.36 किमीच्या मार्गावर धार्मिक स्थळांचा वारसा जपणार

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाविकांसाठी महत्त्वाचा

Nashik Kumbhmela : सिंहस्थ महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याला आजपासून प्रारंभ, तीन दिवस धार्मिक विधींचे आयोजन, शनिवारी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी गोदावरी खळाळली ! गंगापूर धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडले

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदावरी नदीचे कोरडे पात्र

Kanpur Viral News: 'पहिली पूजा मीच करणार'...; करवा चौथच्या पूजेसाठी तीन पत्नींमध्ये पोलीस ठाण्यातच रंगली जुंपली

Kanpur Viral News: करवा चौथचा सण विवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दिवसभर

Nashik Kumbhmela : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांसाठी भव्य दर्शनपथ ! 275 कोटींच्या विकासकामांना गती; कुंभमेळ्यापूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन

Nashik Kumbhmela : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा मुंबईला फटका; विविध भागांत पावसाला सुरुवात

Mumbai Weather: मुंबईत शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी आणि धुरकट वातावरणाचा अनुभव आला. दादर,