ताम्हिणी घाटात थार अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

पनवेल : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव मार्गावर सोमवारी सांयकाळी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने जिल्हा हादरला असून, मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


दरम्यान, २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन पुण्यातील हे सहा तरुण कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ताम्हिणी घाटात गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. सोमवारी घडलेली घटना तब्बल चार दिवसांनी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे असे असून सर्वजण पुण्यात राहणारे आहेत. कोकणात गेलेल्या या तरुणांशी संपर्क होत नसल्याने बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर गुरुवारी सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. बेपत्ता असलेल्या आणखी दोन जणांचा शोध सुरु आहे.


ताम्हिणी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटताच थार गाडी थेट खोल दरीत कोसळली. धोकादायक उतार, खोल दरी आणि चेंदामेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असून, दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.


Comments
Add Comment

Bandra Fire : वांद्रे पश्चिमेतील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai News: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आग

Dadar Station Hawkers : दादर रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा विळखा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील फेरीवाल्यांना क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र देण्यात आल्यानंतर रेल्वे

Bhutan : भूतानमध्ये हिमनदी सरोवराचा उद्रेक; उत्तर बंगालमधील दुआर्स परिसराला सतर्कतेचा इशारा

Bhutan: भूतानमध्ये हिमनदीच्या सरोवराचा उद्रेक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर उत्तर बंगालमधील दुआर्स प्रदेशातील

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Weather News: ऑक्टोबर महिना संपत आला असतानाच राज्यातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि

Devendra Fadnavis : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai News: महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे

मध्य रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक! डोंबिवली अन् घाटकोपरमध्ये रात्री धावणार नाही लोकल, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

मुंबई: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डोंबिवली स्थानकावरील नवीन उत्तर पादचारी पुलाचे