Devendra Fadnavis : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि पुस्तकाचे संपादक व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

Mumbai News: महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून शासन यासाठी पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.


या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि पुस्तकाचे संपादक व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.



व्यंगचित्रकला ही प्रभावी अभिव्यक्तीचे माध्यम


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यंगचित्रकला ही शब्दांचा वापर न करता प्रभावीपणे भाष्य करण्याची कला आहे. समाजातील घडामोडी, विरोधाभास आणि विविध विषयांवर मराठी व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून सातत्याने भाष्य केले आहे.


व्यंगचित्रातून एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे आणि परिस्थितीचे वेगळे पैलू समोर येतात. महाराष्ट्राच्या मातीत ही कला अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



उद्धव ठाकरे यांनी सांगितले व्यंगचित्रकलेचे महत्त्व


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेतील ‘रीडिंग इन बिटवीन द लाइन्स’ अर्थात रेषांमधील अर्थ समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि ‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास त्यांनी सांगितला. व्यंगचित्रकार समाजातील विसंगती अचूकपणे टिपून ती आपल्या कलेतून मांडत असतो, असेही त्यांनी नमूद केले.


व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली.



राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा


राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढताना रेषांचे महत्त्व, त्यातील अचूकता आणि कलाकाराचा स्वाभिमान यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी जुन्या काळातील व्यंगचित्रविश्वातील आठवणींनाही उजाळा दिला. संस्कृती आणि कलेच्या व्यासपीठावर विविध विचारांचे लोक एकत्र येणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.



‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ ठरणार ऐतिहासिक ठेवा


सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुस्तकाच्या निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या मेहनतीचे कौतुक केले. प्रशांत कुलकर्णी आणि ग्रंथालीच्या सदस्यांनी ऐतिहासिक व्यंगचित्रे संकलित करण्यासाठी केलेले काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


तसेच, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव करत पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्ययन केंद्र सुरू करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला अनेक व्यंगचित्रकार आणि कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.


Comments
Add Comment

Central Railway: मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा; अहिल्यानगर-येवला विभागात 'कवच 4.0' ची सुरक्षा तपासणी यशस्वी!

मुंबई: मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी मजल मारली आहे. दिनांक 24 आणि 25 ऑक्टोबर

अहिल्यानगरमध्ये ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य; उपमहापौरांचे कडक निर्देश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या

अहिल्यानगरमध्ये खळबळ! सुरभी हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि. कंपनीच्या

पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना

अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग

जिल्ह्यामध्ये सध्या दीड ते दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असून, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने