शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील अर्थात राणीबागेतील शक्ती वाघाचा (वय ९ वर्षे सहा महिने) १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ मिनिटांनी मृत्यू झाला. पण शक्ती वाघाचा न्यूमोनिया बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी गर्दी करीत असत, पण आता पर्यटकांना ‘जय’ हा वाघ तसेच ‘करिश्मा’ वाघिणीला आता पाहता येणार आहे.



छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती (नर) करिश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण ठरली होती. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी गर्दी करीत असत.



शक्ती वाघाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी अन्न ग्रहण केले नव्हते. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच पाण्यातून औषधही देण्यात आले. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी शक्तीने कोंबडीचे थोडे मांस खाल्ले व पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उलटीचा उमाळा आला. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके आले आणि दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी शक्तीला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण नव्हते.




शक्तीच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) येथील पशुवैद्यकीय पॅथेलॉजी विभागातील प्रोफेसर आणि त्यांच्या चमूने त्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनिया बाधा होवून श्वसन प्रणाली बंद झाल्याने (ग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडते) ओढवला. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर केला जाईल, असे प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूची सविस्तर माहिती नियमानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी इ-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत, प्राणिसंग्रहालयात ‘जय’ हा वाघ (वय ३ वर्षे) तसेच ‘करिश्मा’ ही वाघिण (वय साडेअकरा वर्षे) प्रदर्शनीसाठी उपलब्ध आहेत, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने