मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली आहे. गोरेगावच्या पश्चिमेकडील भागात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे तसेच रात्री उशिरा रस्त्यावर वावरण्यास नागरिक घाबरत आहेत. कुत्रे टोळक्याने येऊन हल्ला करतात त्यामुळे बचावाची संधीच मिळत नाही, असे स्थानिकांनी सांगितले.


मागील काही दिवसांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शाळा, वसाहती, बाजारपेठांच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची टोळकी बिनबोभाट वावरताना दिसू लागली आहे. श्वानप्रेमी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना दूध बिस्किटांपासून ते चिकन मटणापर्यंत खाऊ घालत आहेत. यामुळेच गोरेगावमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे.


दररोज गोरेगवच्या वेगवेगळ्या भागांतून कुत्रे चावल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या तक्रारी वाढू लागल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Sawantwadi Daily Express : मुंबई-सावंतवाडी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून दैनंदिन एक्सप्रेस सेवा सुरू

मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज

Ganeshotsav Mandal : मुंबईतील प्रत्येक श्रीगणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षण मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सार्वजनिक

BMC Expenditure Audit : महापालिका कार्यालय, विभागांमध्ये लाखो रुपयांच्या खर्चाचा स्वैराचार

- मागील एक वर्षांच्या खर्चाचे ऑडीट करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत विभाग

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार?

आयुक्तांनी नगरविकास खात्याला पाठवले पत्र, न्यायालयानेही याचिका फेटाळली पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता

BMC Security System : मुंबई महापालिकेचे सुरक्षा आता उत्तम; मुख्यालयासह प्रबोधनकार नाट्यगृह व इतर ठिकाणी १२७ कॅमेरे

- वॉकी टॉकी, हँड मेटल डिटेक्टर, बूम बॅरियर्सची खरेदी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा