मराठी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये ‘लोकीज स्टुडिओ’ आघाडीवर !

मराठी चित्रपटसृष्टीत प्रमोशनच्या नवनवीन पद्धतींचा ठसा उमटवणाऱ्या क्रिएटिव्ह एजन्सींच्या यादीत आज चर्चेत असलेलं नाव म्हणजे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी स्थापन केलेलं लोकीज स्टुडिओ. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट आणि मराठी मालिकांसाठीही क्रिएटिव्ह कॅम्पेन्स तयार करत या स्टुडिओने इंडस्ट्रीत आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे.


गेल्या काही वर्षांत लोकीज स्टुडिओने ‘बाईपण भारी देवा’, ‘संगीत मानापमान’, ‘पंचक’, ‘धर्मवीर’, ‘बॉईज’, ‘फुले’, ‘खाशाबा’, ‘एक दोन तीन चार’, ‘किर्रर्र काटा किर्रर्र’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ अशा अनेक चित्रपटांसाठी आणि ‘बिग बॉस मराठी’सारख्या मोठ्या कॅम्पेन्ससाठी केलेल्या पोस्टर डिझाईन्स, स्टिल्स, मोशन पोस्टर्स आणि व्हिज्युअल्सनी मराठी इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.


चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा सर्वात प्रभावी क्षण असतो आणि हाच क्षण प्रभावी बनवण्याची कला सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांच्या क्रिएटिव्ह दृष्टीला साथ देणाऱ्या लोकीज स्टुडिओने सातत्याने सिद्ध केली आहे. त्यांच्या डिझाईन्सची शैली, रंगसंगती, कॉन्सेप्टची स्पष्ट लाईन आणि प्रेक्षकांना थेट जोडणारा व्हिज्युअल कनेक्ट या सर्व गोष्टी प्रत्येक चित्रपटाची प्रमोशनल आयडेंटिटी आगळीवेगळी बनवतात.


या स्टुडिओची खासियत म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला त्याच्या विषय, जॉनर आणि टोनशी सुसंगत अशी स्वतंत्र व्हिज्युअल ओळख देण्याचं कौशल्य. कौटुंबिक चित्रपट असो वा ऐतिहासिक; भावनिक कथा असो वा अॅक्शन, प्रत्येक मोहिमेसाठी वेगळा दृष्टिकोन तयार करणं ही त्यांची जमेची बाजू आहे. फक्त प्रमोशन नव्हे, तर निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली आहे. ‘विक्की व्हेलिंगकर’, ‘बायकर्स अड्डा’ या मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली असून, सुप्रसिद्ध ‘हंपी’ या चित्रपटाच्या लाईन प्रोडक्शनची धुरा सुद्धा सांभाळली आहे. या अनुभवांमुळे कथावस्तू समजून घेऊन तिचं व्हिज्युअल ब्रँडिंग नेमकेपणाने सादर करण्याची स्टुडिओची क्षमता मजबूत झाली आहे. आज अनेक दिग्दर्शक आणि निर्माते आगामी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या प्रमोशनची जबाबदारी सचिन आणि अतुल यांच्यावर विश्वासानं सोपवतात.

Comments
Add Comment

अनिरुद्ध आणि काव्या मारनचा नोव्हेंबरमध्ये पार पडणार विवाहसोहळा; पत्रिकेने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याच्या आमंत्रण

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.

King Movie : ओठांवर गुलाब, डोळ्यांत आग! शाहरुख खानचा ‘किंग’मधील खतरनाक अवतार चर्चेत; रिलीजची तारीखही ठरली

King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता या

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे