ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने वडील रणधीर कपूर यांच्या तब्येतीविषयीची माहिती दिलेली आहे. अभिनेत्रीने वडीलांना झालेल्या दुर्धर आजाराबद्दल खुलासा केला आहे.

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच करीना कपूर खान आणि सैफ अली खानने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावलेली होती. यावेळी शोदरम्यान अभिनेत्रीने आपल्या वडीलांना झालेल्या दुर्धर आजाराबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर ह्यांचे वडील ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर आहेत. वयोमानामुळे आणि आजारपणामुळे रणधीर कपूर कोणत्याही चित्रपटामध्ये काम करत नाहीये. रणधीर कपूर यांची लेक आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर हिने आपल्या वडीलांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.



करीना कपूरच्या वडीलांची स्मरणशक्ती कमकुवत झाली असून त्यांना डिमेन्शियाचा त्रास होत असल्याची माहिती तिने स्वत: माहिती दिली आहे. कपूर फॅमिली बॉलिवूड इंडस्ट्रीत कायमच चर्चेत राहणारं नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आजच्या घडीला कपूर फॅमिलीतील अनेक सेलिब्रिटी आहेत. 90 च्या दशकाप्रमाणेच आजच्या घडीलाही कपूर फॅमिलीतल्या कलाकारांची चर्चा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. करीना कपूर खान आणि सैफ अली खानने अलीकडेच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावलेली होती. त्यावेळी तिने चर्चा करताना कपूर फॅमिलीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच दरम्यान अभिनेत्रीने वडीलांच्या तब्येतीविषयी सुद्धा खुलासा केला आहे.



रणधीर कपूर यांच्या तब्येतीबद्दल सांगताना करीना कपूरने सांगितले की, "माझ्या वडिलांचं वय सध्या 80 वर्षाच्या आसपास आहे. वयोमानानुसार त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यांना डिमेन्शिया आजाराचा त्रास होत आहे. अलीकडेच माझ्या घरी आई- बाबा आले होते. वडील सहसा अनेक जुने चित्रपट, त्यांच्या काळातील चित्रपट पाहत ते वेळ घालवतात. त्यांना बऱ्याचदा गोष्टी आठवत नाही. त्यांच्या लक्षात राहत नाही.", अशी माहिती अभिनेत्रीने दिली. "जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की, मी आणि सैफ एका लोकप्रिय कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यावेळी त्यांना फार आनंद झाला होता. तेव्हा मला म्हणाले होते की, तो कार्यक्रम मी आवर्जुन पाहणार आहे.", करीना मात्र वडीलांबद्दल सांगताना शोमध्ये भावूक झाली होती.



सुप्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांच्याविषयी सांगायचे तर, ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक अभिनेते आहेत. त्यांनी 2014 साली रिलीज झालेल्या 'सुपर नानी' चित्रपटामध्ये शेवटचा चित्रपटामध्ये काम केले. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी कोणत्याही चित्रपटामध्ये काम केले नाही. वयोमानामुळे आणि आजारपणामुळे रणधीर कपूर कोणत्याही चित्रपटामध्ये काम करत नाहीये. रणधीर कपूर हे 70 ते 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. 1971 मध्ये 'कल आज और कल' या चित्रपटातून अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटात काम केले. त्यांनी 'हमराही', 'जवानी दिवानी', 'पोंगा पंडित', 'रामपूरका लक्ष्मण', 'कस्मे वादे' सह अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.


रणधीर कपूर ह्यांना, राज कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे भाऊ आहेत. रणधीर कपूर ह्यांनी 1971 मध्ये बबिता शिवदासानीशी लग्न केले. त्यांना करिश्मा कपूर व करीना कपूर या दोन मुली आहेत.

Comments
Add Comment

अनिरुद्ध आणि काव्या मारनचा नोव्हेंबरमध्ये पार पडणार विवाहसोहळा; पत्रिकेने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याच्या आमंत्रण

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.

King Movie : ओठांवर गुलाब, डोळ्यांत आग! शाहरुख खानचा ‘किंग’मधील खतरनाक अवतार चर्चेत; रिलीजची तारीखही ठरली

King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता या

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात वेडी आहे..." ट्रोलर्सना रश्मिका मंदानाची ८ पानांची चपराक; तर विजय देवरकोंडाची सुद्धा ट्रोल्सवर सडकून टीका

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या नात्याबद्दल सोशल